IPL लिलावात या ५ खेळाडूंवर लागणार सर्वाधिक बोली, भारतीय खेळाडूचाही समावेश; पाहा कोणाची नावं आहेत

IPL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी लिलावासाठी ११६६ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. फ्रँचायझी या नावांची शॉर्टलिस्ट करेल आणि फक्त तेच लिलावात प्रवेश करतील. नोंदणीकृत खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. यासोबतच भविष्यात चमकणारे अनेक खेळाडू त्यात आहेत. यावेळी मिनी लिलाव होत असून काही खेळाडूंना मोठी रक्कम मिळू शकते. आम्ही तुम्हाला अशाच ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर सर्वाधिक बोली लावली जाऊ शकते.




शार्दूल ठाकूर

शार्दुल ठाकूरला कोलकाता नाईट रायडर्स संघाने रिलीज केले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शार्दुल हा खालच्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आहे. तो नक्कीच धावा खर्च करतो पण विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो मैदानात सेट झालेल्या खेळाडूंची भागीदारी तोडण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळेच अनेक फ्रँचायझी शार्दुलला विकत घेण्याचा विचार करत असतील.

वानिंदू हंसरंगा

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला आरसीबीने रिलीज केले आहे. तो फिटनेसच्या समस्येमुळे बराच काळ संघाबाहेर राहिला आहे. मात्र आयपीएलपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. हसरंगा हा टी-२० मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. यासोबतच तो खालच्या फळीतही आक्रमक फलंदाजी करू शकतो.

रचिन रवींद्र

न्यूझीलंडचा नवोदित युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने २०२३ च्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. बॅटमधून धावांचा पाऊस पाडणारा रचिन रचिन चेंडूनेही चांगली कामगिरी करतो. यामुळेच आयपीएल फ्रँचायझींच्या नजरा त्याच्यावर आहेत. अनेक संघ त्याला त्यांच्या ताफ्यात जोडण्याची योजना आखत आहेत आणि त्यामुळे मोठी किंमत त्याही मिळू शकते.

गेराल्ड कोएत्झी

गेराल्ड कोएत्झीची गोलंदाजीची शैली बहुतांशी डेल स्टेनसारखीच आहे. तो आपल्या वेगाने फलंदाजांसाठी घातक ठरतो. २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. कोएत्झीकडे अचूक बाउन्सरही आहे. यामुळेच तो लिलावात सर्वात महागडा खेळाडूही ठरू शकतो.


ट्रेव्हिस हेड


ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये काय केले हे सर्वांना माहीत आहे. त्या एका खेळीमुळे हेड आयपीएल लिलावात सर्वात महागडा खेळाडूही बनू शकतो. यासोबतच तो अर्धवेळ फिरकीपटूही आहे. आरसीबीकडून खेळलेल्या हेडला विकत घेण्यासाठी फ्रँचायझी १५ कोटींहून अधिक खर्च करू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने