एका रात्रीत उजळून निघेल त्वचा, लोक विचारतील चमकत्या त्वचेचं रहस्य, आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादनाचा असा करा वापर

महिलांसाठी चेहऱ्याचे सौंदर्य खूप महत्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे त्वचा सैल होऊ लागते ज्यामुळे तुम्ही वयाच्या आधी म्हातारे दिसू लागतात. अशा परिस्थितीत, काही नैसर्गिक गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे जे चेहऱ्याची त्वचा घट्ट करून चेहऱ्याचे कोणतेही नुकसान न होता त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात. आज आपण घरच्या घरी काही उपाय जाणून घेणार आहेत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून चिरतरूण त्वचा मिळवू शकता. चाला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.




कोरफड

कोरफड एक ताजे पान कापून आणि त्याचे जेल काढा. त्यानंतर हे जेल चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर जेल लावल्यानंतर चेहरा सुकण्यासाठी सोडा, कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. चांगल्या परिणामांसाठी हे दररोज करा. रोज रात्री तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने तुमची त्वचा सुंदर होण्यास मदत होईल.

​चंदनाचा मास्क

चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील धूळ, तेल आणि डेड स्किन तर निघून जातेच पण त्वचा घट्ट होण्यासही मदत होते. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर लगेच सुकते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता.

​दह्याचा असा करा वापर

लिंबाचे थेंब टाका आणि चांगले मिसळा. आता ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. आणि तीन ते चार मिनिटे मसाज करा. मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने नीट धुवा. असे केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होण्यासही मदत होते. दह्याचा असा वापर केल्याने तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स केवळ चेहऱ्याची त्वचा सुधारत नाहीत तर चेहऱ्याची त्वचा घट्ट होण्यासही मदत करतात. यासाठी टोमॅटोचा रस काढा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता.

थोडया पाण्यात थोडी तुरटी

घालून नीट मिसळा. त्यानंतर हे पाणी कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. आणि चेहरा कोरडा होऊ द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पद्धतीचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होण्यासही मदत होते.

लिंबू

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचेतील कोलेजन वाढते आणि लवचिकता येते. ज्यामुळे त्वचा हळूहळू घट्ट होण्यास मदत होते. ते वापरण्यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्या आणि कापसाच्या साहाय्याने चेहरा आणि मानेवर पूर्णपणे लावा आणि नंतर कोरडे राहू द्या. कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

अंडी

हा उपाय करण्यासाठी एक अंडे घ्या, ते फोडा आणि नंतर त्याचा पिवळा भाग वेगळा करा. आणि उरलेला पांढरा भाग चेहऱ्यावर लावा आणि आरामात झोपा. कोणाशीही बोलायचे नाही आणि हसायचे नाही हे लक्षात ठेवा. त्यानंतर ते सुकल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा असे करा, असे केल्याने त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढेल आणि सैल त्वचा घट्ट होण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने