सलमान खानचा “ दबंग ३ “ वादात : प्रदर्शन करण्यावर बंदी घालण्याची मागणी

सलमान खानचा “ दबंग ३ “ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस  येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणीही रिलीज झाली आहेत. साहजिकच भाईजानच्या चाहत्यांचा ऊत्साहा शिगेला पोहोचला आहे . पण आता भाईजानचा दबंग ३ हा सिनेमा वादात सापडला आहे. होय, वाद इतका विकोपाला गेला आहे कि, आता दबंग ३ प्रदर्शनावर बंदी टाकण्याची मागणी होत आहे . आता हा वाद का होत आहे ? जाणून घेऊया. 
या चित्रपटातील एका गाण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. या गाण्याद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितेने केला. 

रिपब्लिक वर्ल्ड या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार,चित्रपटाचे ‘ हुड़ हूड दबंग ‘ हे टायटल सॉंग हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचा आहे. या समितीचे महाराष्ट व झारखंडचे आयोजक सुनील घनवट यांनी या गाण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. या गाण्यातील काही ऋषी सलमानसोबत आक्षेपाहपद्धतीने डान्स करताना दिसत आहेत. हे सगळे हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्यामुळे सुनिल घनवट यांनी म्हटले आहे. ऋषीमुनींच्या जागी मौलवी आणि फादर -बिशप याना नाचताना दाखवण्याची हिंमत मेकर्स करतील का ? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. 


दबंग ३ हा “ दबंग” फेचाईजीचा तिसरा पार्ट आहे प्रभुदेवा दिगदर्शित या चित्रपटात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा , सई मांजरेकर ,किच्चा सुदीप ,  मुख्य भूमिकेत आहेत. “दबंग” “ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात सलमाने साकारलेली चुलबुल पांडेही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. या चित्रपटाची सगळीच गाणी खूप गाजली होती. एवढेच नाही तर या चित्रपटातील संवाद लोकांच्या तोंडपाठ झाले होते. या चित्रपटातील सोनाक्षी सिन्हा यांची केमिस्ट्रीची देखील चर्चा होती. 

थोडे नवीन जरा जुने