आलियाचा हात सोडून आईबरोबर चालणाऱ्या रणबीरवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले “बायको गरोदर असूनही…”

 

मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. सध्या ती गरोदरपण एन्जॉय करतेय. अनेकदा ती रणबीर कपूरसह स्पॉट होते. अशात सोशल मीडियावर व्हायरल आलिया रणबीरचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात डिनरनंतर आलिया भट्ट, नीतू कपूर आणि रणबीर कपूर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. आलिया रणबीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीर कपूरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आलिया, रणबीर आणि नीतू कपूर हे तिघंही रेस्टॉरंटमधून बाहेर पडून कॅमेराच्या दिशेने येताना दिसत आहेत आणि त्यावेळी नीतू कपूर आपल्या मुलाचा हात पकडून चालत असलेल्या दिसत आहेत. तर आलिया एकटीच या दोघांच्या पुढे चालत असलेली दिसत आहे. पण आता यावरून रणबीरला ट्रोल केलं जातंय कारण आलिया गरोदर असताना तिला आधार द्यायचं सोडून रणबीर त्याच्या आईबरोबर चालताना दिसत आहे.एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “इथे नक्की प्रेग्नंट कोण आहे, आलिया की याची आई.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “सासू आणि नवऱ्याला प्रेग्नंट आलियाशी काही देणं घेणं नाही. खरं तर त्याने आलियाचा हात पकडायला हवा.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “आलिया प्रेग्नंट असूनही पुढे एकटी चालली आहे. खरं तर रणबीर किंवा नीतू कपूर यांनी पुढे चालायला हवं किंवा किमान आलियाबरोबर चालायला हवं. पण ती एकटी चालली आहे आणि आई मुलाचा हात पकडून चालत आहे हे खूप विचित्र आहे.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने