Richa-Ali Wedding: 'बुरखा,हिजाब,जिहाद...' म्हणत का केलं जातंय ऋचा-अलीचं लग्न ट्रोल?

मुंबई: Richa-Ali Wedding Trolled: जवळपास १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले ऋचा चड्ढा आणि अली फजल अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतच त्यांचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. त्यांनी मुंबईत ग्रॅन्ड रीसेप्शनही दिलं,ज्यात बॉलीवूडचे चमकते सितारे सामिल झाले होते. ट्वीटरवर देखील दोघांचे लग्न जोरदार ट्रेन्डिंगला होते. चाहते त्यांना भरभरुन शुभेच्छा देत आहेत, पण यातले काही लोक दोघांच्या लग्नाला मात्र ट्रोल करताना दिसत आहेत. त्यांनी दोघांच्या प्रेमाला 'लव-जिहाद' नाव देऊन टाकलंय. ऋचाला नव्या संसारासाठी आशीर्वाद देण्याचं सोडून लोक तिला 'बुरखा हिजाब मुबारक' म्हणत शुभेच्छा देताना दिसत आहेत.(Richa chadha-Ali Fazal wedding trolled, love-jihad, burka, hijab tweet viral)ऋचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नानंतर लोक खूप भडकाऊ शब्दात टीका करताना दिसत आहेत. जर तुमचा प्रेमावर विश्वास असेल तर ज्या शब्दात लोकांनी दोघांवर टीकास्त्र सोडलंय ते वाचून आपल्याला नक्कीच राग येईल. इथे बातमीत काही ट्वीट जोडलेले आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने