‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये छोट्या हास्यवीरांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी, ‘इथे’ देता येणार ऑडिशन

मुंबई:  छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवर्जुन पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील विनोदवीर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. समीर चौगुले, गौरव मोरे, वनिता खरात, नम्रता संभेराव या कलाकारांनाही याच कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात आता हास्यजत्रेच्या या सम्राटांबरोबर छोट्या हास्यवीरांनाही झळकण्याची संधी मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीकडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – छोटे हास्यवीर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याबाबत माहिती देणारा व्हिडीओ सोनी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – छोटे हास्यवीर’ स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांना सहभाग घेता येणार आहे. 

यासाठी छोट्या हास्यवीरांच्या विनोदी सादरीकरणाचा व्हिडीओ सोनी लिव ॲपवर अपलोड करायचा आहे. यातील सर्वोत्तम पाच विजेत्यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आज रात्री(२० ऑक्टोबर) रात्री नऊनंतर ऑडिशन स्वीकारल्या जाणार आहेत.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी प्रेक्षकही आतुर आहेत. सोनी मराठीच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने