प्रणय, प्रेम अन् नातेसंबंधांचा ट्रिपल तडका; ‘फोर मोर शॉटस प्लीज’च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : ‘विरे दी वेडिंग’ या चित्रपटाप्रमाणेच प्राइम व्हिडिओच्या ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसीरिजला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या सीरिजच्या दोनही सीझनप्रमाणे येणारा नवा सीझनही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी प्राइम व्हिडिओने ‘फोर मोर शॉट्स प्लीज!’ या एमी पुरस्कारांसाठी नामांकन पटकावणाऱ्या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली होती. आता या नव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणेच या ट्रेलरलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

जोयीता पटपटिया यांचे दिग्दर्शन, देविका भगत यांचे लेखन आणि इशिता मोईत्रा यांचे संवाद असलेली ही बहुप्रतिक्षित अॅमेझॉन ओरिजिनल सीरिज दुसऱ्या सीझनमध्ये ज्या नाट्यमय वळणावर थांबली होती, तिथूनच या पुढील सीझनची सुरुवात होणार आहे. या नव्या सीझनचा ट्रेलर अंजना मेनन (कीर्ती कुल्हारी), दामिनी रॉय (सयानी गुप्ता), सिद्धी पटेल (मानवी गागरू) आणि उमंग सिंग (बानी जे) या चार मैत्रिणींच्या जीवनाची एक आकर्षक झलक दाखवतो ज्या जीवन, प्रेम आणि त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवीन आणि जुने चेहरे, आणि एक कुतूहलजनक कथानकाने भरपूर ‘फोर मोअर शॉट्स प्लीज!’चा तिसरा सीझन प्रणय, नाटक, विनोद, नातेसंबंध यावर भाष्य करणारा असल्याचं स्पष्ट होत आहे.या शोबद्दल बोलताना सयानी गुप्ताने सांगितले की, “पहिले दोन सीझन प्रचंड लोकप्रिय झाले होते आणि चाहत्यांकडून त्यांना भरभरून प्रेम आणि प्रशंसा मिळाली. तिसऱ्या सीझनमध्ये या चौघीअधिक मजा करताना दिसतील, त्यांची मैत्री अजूनच घट्ट होत जाईल, जे प्रेक्षक दररोज तिसऱ्या सीझनबद्दल विचारणा करत आहेत, त्यांनी हा शो पहावा. यासाठी मी खूप उत्सुक आहे!” आपला उत्साह व्यक्त करताना कीर्ती कुल्हारी म्हणाली की, “या वेबसीरिजवरील प्रेमच आम्हाला प्रत्येक सीझनमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यास भाग पाडत असते. आशा करत आहोत की आम्हाला हे पुन्हा एकदा यात यश मिळेल. या सीझनमध्ये मुली अधिक आनंदी, कामुक (सेक्सी) आणि स्वावलंबी बनल्या आहेत आणि त्या आपल्या चुकांमधून शिकत आहेत.” यांच्याबरोबरच मानवी आणि बानी यांनीही याच शब्दांत त्यांचं मनोगत व्यक्त केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने