भाजपाला उशीरा सुचलेले शहाणपण”, भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अन्यथा…

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून याबाबत घोषणा केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते एबीपी माझा या वृत्तमाध्यमाशी बोलत होते.“राज्यात गेले काही दिवस राजकीय नाट्य सुरू होते. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने न्यायालयात जाणे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावणे, हे अत्यंत क्लेशदायक होते. अंधेरी पोटनिवडणुकीसाठीच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवण्यात आलं. मात्र, शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपाला उशीरा सुचलेले शहाणपण आहे. अन्यथा भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असते,” असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने