शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे

कोल्हापूर :  मायबाप सरकार आपण केवळ पाहणी दौरे करीत आहात, मात्र, अतिवृष्टीने गांजलेल्‍या शेतकऱ्यांना कुठलीही ठोस मदत करीत नाही, अशा परिस्‍थितीत आम्‍ही कुणाकडे पाहावे असा आर्त सवाल मलकापूर तालुक्‍यात परतीच्‍या पावसाने उभ्यास खरीप पिकांची राखरांगोळी केली. मात्र, वर्षातील महत्‍वाचा सण असलेल्‍या दिवाळीत देखील शेतकऱ्यांना ठोस मदत मिळाली नाही, त्‍यामुळे शेतकरी निराश झाले असून, अवघ्या वर्षात खर्च कसा भागवावा असा प्रश्न पडला आहे.मलकापूर तालुक्‍यात गत तीन वर्षापासून सरासरीपेक्षा दुपटीने पाऊस पडत आहे. यंदा पुन्‍हा शेतकऱ्यांनी पदरमोड करुन काळ्या आईची ओटी भरली. मात्र, परतीच्‍या पावसाने अखेर घात केला. शेतात तरारणारी उभी पिके सप्‍टेंबर व ऑक्‍टोबर महिन्‍यात झालेल्‍या परतीच्‍या पावसाने गिळंकृत केली. यंदा चांगले उत्‍पन्न मिळेल, कर्ज तारण आणि लोकांची देणी फेडू अशी स्‍वप्‍ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्‍या नशिबी परतीचा पाऊस आला. अवघ्या पावसाळ्यात जेवढा बरसला, त्‍यापेक्षा अधिक सप्‍टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्‍यात झाला. एकुणच शेतात उभी पिके परतीच्‍या पावसाने हिरावून नेली. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या स्‍वप्‍नांवर पाणी फेरले गेले.अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला गेला. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि नगदी पीक कपाशीचे झाले. यापुर्वीच सातत्‍याने दोन वर्षांपासून अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्‍याने आकंठ बुडालेल्‍या शेतकऱ्यांना यंदा तरी काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना परतीच्‍या पावसाने उभी खरीप पिके करपून टाकली. त्‍यात अनेक फळबागधारक शेतकऱ्यांच्‍या मोसंबी, डाळिंब आदि पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्‍यामुळे मलकापूर तालुक्‍यातील शेतकरी पुरता नैराश्याने ग्रासला आहे. त्‍यात आमदार, कृषीमंत्री, जिल्‍हाधिकाऱ्यांनी आपत्‍तीपत्र भागात पिकांचे पाहणी दौरे केले. मात्र, प्रत्‍यक्षात शेतकऱ्यांना कुठलीच ठोस मदत मिळाली नाही.

विशेष म्‍हणजे वर्षातील महत्‍वाचा सण दिवाळी आलेला असताना त्‍यात शासन आपत्‍तीग्रस्‍त शेतकऱ्यांना मदत करेल, अशी अपेक्षा असता तीही फोल ठरली. त्‍यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्‍या शेतकऱ्यांना अखेर कर्ज काढून, घरातील दागदागिने तारण ठेऊन कशीबशी दिवाळी साजरी करावी लागली. पोशिंद्यावर अशी वेळ येत असेल तर सरकार कुणासाठी आहे ? असा सवाल आपत्‍त्‍ाीग्रस्‍त शेतकरी विचारत आहेत.तालुक्‍यात मागील तीन वर्षापासून अतिवृष्टीने खरीप पिकांची राख रांगोळी केली. यदा खरीप पिके भरीस आलेली असताना परतीच्‍या पावसाने घात केला. ही वस्‍तुस्‍थिती शासन आणि अधिकाऱ्यांकडे मांडून देखील अद्याप आपत्‍तीग्रस्‍त शेतकऱ्यांना न्‍याय मिळत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने