अर्जुन-मलायका बोहल्यावर?, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण...

मुंबईः मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलीवूडचं सगळ्यात हॉट कपल. दोघांच्या लव्हलाईफची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली दिसते. त्यांचे एकत्र असे फोटो देखील व्हायरल होताना दिसतात. दोघं एकमेकांविषयीचं प्रेम बिनधास्त व्यक्त करतानाही नेहमी दिसतात.पण आता यापेक्षा हटके काहीतरी समोर आलेलं आहे या दोघांविषयी, ज्यानं लोक आता अंदाज लावू लागलेत की अर्जुन कपूरनं मलायकाला लग्नासाठी प्रपोज केलं असावं आणि तिनं देखील त्याला होकार दिला असणार. मलायकानं नुकत्याच केलेल्या एका पोस्टनं हेच समोर येत आहे की तिनं अर्जुन कपूरला लग्नासाठी होकार दिला आहे.मलायका अरोरानं गुरुवारी सकाळी-सकाळी एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिनं त्या पोस्टला कॅप्शन दिलं आहे की, ''मी हो म्हटलं...'', तिनं आपला बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरला ही पोस्ट टॅग केली नाही ना त्याचा कुठे पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. मलायका आणि अर्जुनला शुभेच्छा देण्यासाठी मात्र लोकांनी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. कुणी म्हटलंय,'वा..' तर कुणी 'ओ..माय गॉड'.

मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी २०१९ मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी आपल्या नात्याला सर्वांसमोर कबूल केले. दोघांच्या लग्नाविषयी देखील लोकाची कुजबूज सुरू होती. आणि अर्जुन कपूरनं देखील आपल्या काही मुलाखतींमधून सांगितलं होतं की मलायकासोबत लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर मी माझ्या चाहत्यांसमोर ही घोषणा करीन.काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर 'कॉफी विथ करण' मध्ये आला होता तेव्हा म्हणालेला की,''सध्या मी लग्नाचा विचार करत नाही. मी माझं आणि मलायकाचं नात खूप विचार करून लोकांसमोर आणलं कारण मला माहित होतं यावर सगळे कसे रिअॅक्ट होतील. मी खूप स्पष्ट विचारांचा माणूस आहे. मी काहीच लपवणार नाही. पण मला अजून आयुष्यात स्थिर व्हायचं आहे. जर मी खूश असेन तर मी माझ्या पार्टनरला खूश ठेवू शकेन''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने