आता बस्स Sss 'वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल कोश्यारींचे सूचक वक्तव्य

मुंबईराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांच्या या विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे राज्यपाल चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान, त्यांचे एक सूचक वक्तव्य चर्चेत आले आहे.

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केल होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नव्या वादाला सुरूवात झाली. त्यांनी माफी मागावी तसेच आम्हाला हे राज्यपाल नको. अशी मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, विरोधापक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भेटीवेळचा किस्सा सांगितला.अजित पवार यांनी जेव्हा राज्यपालांशी संवाद साधताला तेव्हा कोश्यारी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांनी राज्यापालांची भेट घेतली तेव्हा, त्यांनी "बस आता मला परत जायचं आहे." असे सूचक विधान केलं आहे. त्यांचे हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.उत्तराखंडच्या बगेश्वर जिल्ह्यात भगत सिंह कोश्यारी यांचा 17 जून 1942 रोजी जन्म झाला. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य होण्याआधी उत्तर प्रदेशचा भाग होता. त्यामुळं कोशियारींचं बालपण, शिक्षण आणि सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभही उत्तर प्रदेशातच झाली. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने