World Toilet Day 2022: जगातील सगळ्यात महागडं टॉयलेट! ज्याची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

मुंबई : आज १९ नोव्हेंबर म्हणजेच विश्व शौचालय दिवस आहे. शौचाला जाणे दैनंदिन क्रियेतील एक महत्वाचा भाग आहे. जसजसे जग बदलत गेले तसतसे आपल्या जीवनशैलीत आणि रोजच्या वापराच्या वस्तूंतही बरेच बदल झालेत. हे टॉयलेटच्या बाबतीतही घडून आले.१९ नोव्हेंबर २००१ मध्ये डब्ल्यूटीओ म्हणजेच वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायजेशनची स्थापना झाली. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश हा लोकांना उघड्यावर शौचास बसण्यापासून रोकणे हा होता. आज देशभऱ्यात १०० मीलियनपेक्षाा जास्त घरात शौचालय उपलब्ध आहेत. आज आपण जाणून घेऊया जगातील सगळ्यात महागड्या टॉयलेटबाबत.वर्ल्ड टॉयलेट डे सेलिब्रेट करण्यासाठी दरवर्षी एक नवी थीम ठेवली जाते. या पद्धतीने लोकांमध्ये जागृकता पसरवली जाते. यावर्षीची थीम मेकिंग द इनविजिबल विजिबल अशी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जगातील 3.6 बिलीयन लोकांपर्यंत अजूनही शौचालय आणि स्वच्छतेची जागृकता नाही. अजूनही 673 मिलीयन लोक उघड्यावर शौचाला जातात.हे आहे जगातील सगळ्यात महागडं टॉयलेट

बऱ्याच लोकांना असं वाटतं की जगातील सगळ्यात महागडं टॉयलेट हे जगातील सगळ्या श्रीमंत व्यक्ती सुल्तानजवळ असेल. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार जगातील सगळ्यात महागडं टॉयलेट पृथ्वीवर नसून अवकाशात असल्याचं सांगितल्या जातंय.या टॉयलेटला बनवण्यामागे 1 अब्ज 36 कोटी 58 लाख एवढा खर्च आला. याची देखरेख करण्यासही बराच खर्च येतो.

टॉयलेटवर रोज बसतात 200 टक्क्यांहून अधिक बॅक्टेरिया

म्हटलं जातं की टॉयलेटच्या सीटवर रोज २०० टक्क्यांहून अधिक बॅक्टेरिया असतात. म्हणून टॉयलेटची रोज स्वच्छता करणे गरजेचे आहे. तसेच शौचाकडून आल्यानंतर हात धुणेही गरजेचे आहे. मात्र २० टक्के लोक शौचाकडून आल्यानंतर अजूनही हात धुवत नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने