FIFA विश्वचषक कार्यक्रमात नोरा दिसेना; चाहते म्हणाले, “शोधू कुठं?”

कतार: रविवारपासून कतार फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२च्या उद्घाटन समारंभात मोठ्या दिमाखात पार पडला. यात  पाच आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार आपली कला सादर करताना दिसणार होत. हा भव्य उद्घाटन सोहळा दोहा येथील अल बिद्दा पार्क येथे झाला, ज्यामध्ये जगभरातील २० हून अधिक कलाकार संध्याकाळची रंगत वाढवणार होते.FIFA विश्वचषक स्पर्धेला एका भव्य उद्घाटन सोहळ्यासह प्रसंगी बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही देखील धिरकणार होती. चाहते तिचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सूक होते. भारतातही तिचा डान्स पाहण्यासाठी टिव्हि सेटवर समोर नजरा लावून चाहते तिच्या डान्सची वाट पाहत होते मात्र ती काही दिसलीच नाही.किक-ऑफच्या एका अहवालाच्या सांगण्यात आल्यानुसार, नोरा मोठ्या मंचावर परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज होती, तथापि, अभिनेत्री ओपनिंग शोमध्ये परफॉर्म करणार नव्हती,तर 29 नोव्हेंबर रोजी फिफा फॅन फेस्टिव्हलमध्ये इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसोबत नोरा परफॉर्म करणार आहे.मात्र तिच्या परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सूक लोकांनी ट्विटवर धडाधड ट्विट करण्यात सुरवात केली.उद्घाटन समारंभानंतर अनेकांनी टि्वटरवर विचारले की, "नोरा फतेही कुठे होती काही कल्पना?" तर दुसर्‍याने ट्विट केले, "मी कुठेतरी वाचले होते की #Norafatehi ला FIFA मध्येही परफॉर्म करणार आहे.. ते झालं नाही.""नोरा फतेही कुठं आहे? आम्ही वाट पाहतोय पण ती फिफा विश्वचषक 2022 च्या उद्घाटन समारंभात नव्हती," दुसर्‍या निराश चाहत्याने विचारले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने