घटस्फोटाच्या अफवे दरम्यान बोटीवर मजामस्ती करताना दिसले दीपिका-रणवीर, क्यूट व्हिडीओनं वेधलं लक्ष

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच उलट-सुलट चर्चा कानावर पडत होत्या. दोघांमध्ये दुरावा आला आहे, ते विभक्त होतायत अशा अनेक अफवांवर रणवीरने एक व्हिडीओ पोस्ट करत सडेतोड उत्तर दिले आहे. आता हा व्हिडिओ सर्व सांगत आहे या दोघांमध्ये सगळं काही ओके आहेबऱ्याच दिवसांनी रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोण सोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. ज्यामध्ये दीपिका आणि तो एका यॉटवर प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ते परदेशात आऊटिंगसाठी गेल्याचं दर्शवत आहे.हा व्हिडिओ रणवीर सिंगनं शेअर केला आहे. रणवीर सिंगने व्हिडीओ पोस्ट करत दीपिका पदुकोणसाठी असं लिहिले आहे. त्याने व्हिडिओमध्ये ‘गुड व्हायब्स’ टॅग देखील जोडला आहे. यात दीपिका एका यॉटवर रणवीरच्या समोर बसलेली दिसते. ती पांढरा टी-शर्ट, पांढरे शूज आणि सॉक्ससह काळ्या शॉर्ट्समध्ये आहे. रणवीर तिच्यासोबत पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या ट्रॅक पॅंटमध्ये आणि नियॉन रंगाच्या चप्पलमध्ये दिसत आहे. दोघांनी आपलं ड्रेसिंग एकदम मॅचिंग ठेवलेलं आहे. ते यॉटवर त्यांचा वेळ एन्जॉय करत असताना, दीपिका काहीतरी बोलताना दिसतेय आणि अचानक ती तिच्या समोर पाय पसरुन बसलेल्या रणवीरच्या पायांवर फटका मारते.तर व्हिडीओत दीपिका तिच्या पतीसोबत बोट चालवतानाही दिसली. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनं सोशल मीडियावरही त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने