आता गुन्हेगारही जावू शकणार सौदीला; पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटबाबत मोठा निर्णय

सौदी - सौदी अरेबियाला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, मध्यपूर्वेकडील देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी त्यांना आता पोलिसांकडून क्लिअरन्स सर्टिफिकेट सादर करण्याची गरज भासणार नाही. सौदी अरेबियाच्या दूतावासाने गुरुवारी या निर्णयाची घोषणा केली आहे.सौदी दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही देशांच्या संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे गुन्हेगारांना सौदीला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.दूतावासाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, "सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध आणि धोरणात्मक भागीदारी लक्षात घेता, सौदी सरकारने भारतीय नागरिकांना पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) सादर करण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने