ऑनलाइन पेमेंट करताय? सावधान, एक चूक अन् अकाउंट होइल रिकामं

मुंबई: सध्या QR Code Scam फार वेगात पसरत आहे. नीट काळजी घेतली नाही तर तुमच्या अकाउंटमधून पण पैसे स्कॅमरच्या अकाउंटमध्ये जाऊ शकतात. याधीपण सिक्युरिटी रिसर्च फर्मने याविषयी तक्रार केली आहे.हा स्कॅम नवा नाही. OLX वर पण बऱ्याचदा लोक या स्कॅममध्ये अडकतात. नुकतीच एक महिला यात अडकली आहे. स्कॅमरने दिलेल्या किमतीत वस्तू खरेदी करण्याची तयारी दाखवली. त्याचं पेमेंट ऑनलाइन करण्यासाठी त्याने QR Code पाठवला. पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी फोन पे किंवा जी पे कोड स्कॅन करून यूपीआय पीन एंटर करावा लागतो.असं केल्याबरोबर महिलेच्या अकाउंटमधून पैसे कट झाले. त्यामुळे तिने सायबर क्राइममध्ये तक्रार केली. याशिवाय अजून एका पध्दतीने स्कॅम केला जातो. यात सार्वजनिक ठिकाणी जसं की, पेट्रोल पंपावर स्कॅन करताना त्या कोडवर स्कॅमर आपला कोड लावतात. असं केल्याने स्कॅमरकडे पैसे जातात. आणि आपल्याला फार उशीरा समजतं.अशी घ्या काळजी

  • कोणत्याही दुकानात पेमेंट करताना QR Code स्कॅन करताना एकदा व्हेरीफाईड नाव बघून कंफर्म करा.

  • जर कोणता QR Code स्कॅन केल्यावर अनोळख्या वेबसाइटवर रिडायरेक्ट केलं जात असेल तर सावध व्हा.

  • कोणत्याही पेमेंटला रिसिव्ह करण्यासाठी युपीआय पिन एंटर करण्याची आवश्यकता नसते.

  • त्यामुळे जर कोणी पेमेंट सेंड करण्याऐवजी QR Code स्कॅन करायला सांगत असेल तर ताबोडतोब साइबर क्राइमला तक्रार करावी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने