लाल रंगाचीच फित का? जाणून घ्या कहाणी

दिल्ली: जागतिकस्तरावर चिंचा वाढवणारा आजार म्हणजे एचआयव्ही एड्स आहे. हा विषाणू शरीरात वाढत आहे याचा लोकांना बऱ्याचदा पत्ताच नसतो. त्यामुळे याचा संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते. म्हणूनच याची जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.एड्सच्या जनजागृतीसाठी संकेतात्मक लाल फितीचा वापर केला जातो. प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या रंगाच्या फिती वापरल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, एड्स साठी लाल रंगाचीच फित का असते? जाणून घ्या कहाणी.कोणी केली निर्मिती?

कला व्यावसायिकांनी 1988 मध्ये व्हिज्युअल एड्स नावाच्या गटाची स्थापना केली होती. ते न्यूयॉर्कच्या ईस्ट व्हिलेजमधील गॅलरीत एकत्र येत असत. एड्सचा कला समुदायावर कसा परिणाम होत आहे हे ओळखून कलाकार, कला संस्था आणि कला प्रेक्षकांना एड्सवर थेट कृती करण्यासाठी प्रेरीत करण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यांनी जाहिरातीसाठी हे व्हिज्युअल चिन्ह तयार केले होते.

कशी झाली निर्मिती?

आखाती युद्धात सेवा देणाऱ्या अमेरिकन सैनिकांचा सन्मान करणाऱ्या पिवळ्या फितींपासून ही कल्पना प्रेरित झाली होती. त्यांनी फक्त एचआयव्ही ग्रस्त लोकांसोबतच्या एकजुटीचेच नव्हे तर एड्स-संबंधित आजाराने मृत्यू झालेल्यांचे स्मरण करण्यासाठी 'लाल रिबन' तयार केली.

लालच रंग का?

UNAIDS च्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रकल्पाच्या संस्थापकांनी नमूद केले आहे की लाल रंग "रक्ताशी संबंध आणि उत्कटतेची कल्पना म्हणून निवडला गेला होता - यात केवळ रागच नाही तर व्हॅलेंटाईनसारखे प्रेम व्यक्त होते." अशा प्रकारे हा प्रकल्प रेड रिबन प्रकल्प म्हणून ओळखला गेला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने