मोदी-शाह सोडवणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न? दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक

दिल्ली: सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद राज्यात पेटलेला असताना दोन्ही राज्यातील नेत्यांकडून सतत वक्तव्य केली जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात देखील त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. दरम्यान या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे. या बद्दलची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे लवकरच त्याचे नियोजन केले जाईल माने यांनी सांगितले. दरम्यान हरीश साळवे हे या प्रकरणात वकील म्हणून काम करतील, तसेच त्यांच्यासोबत अधीक वकील जोडून देत आहोत अशी माहिती देखील खासदार माने यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमाप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. 17 जानेवारी 1956 मध्ये रोजी बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली होती. बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांचं प्राबल्य असतानाही महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे इथल्या जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या 50 वर्षापासून बेळगावची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी लढा सुरु केला होता, तो अद्यापही कायम आहे.मागच्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात सीमेवरून वाद सुरू आहे, तसेच या प्रकरणी दोन्ही राज्यांकडून आपापली बाजू मांडली जात आहे. यादरम्यान भाजप नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याची इंचभर जमीन देखील कर्नाटकला देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. मागच्या सरकरपेक्षा सध्याचं सरकार बळकट असल्याचे देखील बावनकुळे म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने