'पिक्चर चले न चले नवाजुद्दीन चलेगा'!

मुंबई: बॉलीवूडमध्ये आपल्या भूमिकेनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठा खडतर प्रवास करुन बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय व्हर्सेटाईल अभिनेता झालेल्या नवाझुद्दीनचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यानं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील स्वताची क्षमता सिद्ध केली आहे. केवळ हिंदीच नाहीतर हॉलीवूडमध्ये देखील नवाझुद्दीननं अभिनय केला आहे.सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेनं तर नवाझुद्दीनला वेगळयाच उंचीवर नेवून ठेवले आहे. बॉलीवूडमधील सर्वात आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आता नवाझुद्दीनचे नाव आवर्जुन घेतले जाते. नवाझुद्दीनचे फोटोग्राफ, मोतीचूर चकनाचूर आणि हिरोपंती सारखे चित्रपट काही चालले नाही. त्याला बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे नाराज झालेल्या नवाझुद्दीननं एका मुलाखतीमध्ये परखडपणे आपली भूमिका मांडली आहे.नवाझुद्दीननं आपला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याचा दोष हा कधीच दिग्दर्शक किंवा निर्मात्याला दिलेला नाही. त्यानं ती आपली चूक मानली आहे. आपल्या भूमिकेत कुठली कमतरता राहिली असेल म्हणून तो चित्रपट चालला नाही. किंवा तो प्रेक्षकांना आवडला नाही. असे नवाझुद्दीन सांगत आला आहे. आताही त्याच्या एका विधानानं सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन त्याच्या एका हिट चित्रपटासाठी झगडताना दिसतोय. त्याविषयी त्याला विचारण्यात आल्यानंतर त्यानं खास शैलीत उत्तर दिले आहे.मला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर काहीही फरक पडलेला नाही. मी नेहमी पुढील चित्रपटातून आणखी काय चांगले करता येईल याचा विचार केला आहे. मी माझे काम प्रामाणिकपणे करत आलो आहे. मेहनत करण्यास मी काही मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे चित्रपट चालू न चालो मी मात्र नेहमीच चालत राहणार. नवाझुद्दीनच्या त्या उत्तरावर नेटकरी फिदा झाले असून त्यांनी त्याचे कौतूक केले आहे. त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने