“तेजू तुझं अर्ध्यावर खेळ सोडून जाणं माझ्यासाठी…” किरण मानेंचे तेजस्विनी लोणारीला पत्र

 मुंबई: बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात विजेतेपदाची दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनी लोणारीला घराबाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी तिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी फेसबुकवर विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. नुकतंच किरण मानेंनी तेजस्विनी लोणारीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी तिला एक भावूक पत्र लिहिलं आहे.दरम्यान तेजस्विनीला टास्कदरम्यान गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं. यानंतर डॉक्टरांशी सल्ला घेतल्यानंतर तिची हाताची जखम गंभीर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिला घराबाहेर पडावे लागले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने