या सरत्या वर्षामध्ये कसं होतं देशाचं आरोग्य?

मुंबई : कोरोनातून सावरताना २०२२मध्ये भारताची आरोग्य स्थिती नेमकी कशी होती?  माणसांच्याच नव्हे तर जनावरांच्या आजारांच्या अनेक साथींनी देशाला भंडावून सोडलं होतं. यंदा आपल्या देशाची तब्येत नेमकी होती तरी कशी?

कोरोनाचं काय  झालं?   मागील दोन वर्षाचा तुलनेत भारताचा आरोग्य दर सुधारलाय. संपूर्ण देशाचा विचार केला तर यंदा केरळ हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून अव्वल ठरलं. या शर्यतीत महाराष्ट्राचा नंबर पार लांबचा आहे. भारतात आतापर्यंत  4,46,75172 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.   त्यापैकी 5,30,638   लोक कोरोनाने  मृत्यूमुखी पडले.   ( 7 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार)जानेवारी २०२२नंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती होती मात्र कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आणि तो धोका टळला.  

मंकी पॉक्सची भीती

जुलैमध्ये मंकी पॉक्स या आजाराची काळी सावली जगावर पडली होती. कोरोनातून सावरणाऱ्या जगासाठी हा आणखी एक मोठा धक्का होता. ब्रिटनसह युरोपीय देशांनंतर अमेरिका आणि भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशात एक प्रकारे भीतीचे वातावरण होते. हा रोग उंदरांमुळेही पसरत असल्याचे मानले जात होते.प्राण्यांचे मांस खाताना ते नीट न शिजवल्यानेही या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्यातही संक्रमित प्राण्याचे मांस नीट न शिजवता खाल्याने हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.लम्पीचा वाढता धोका

सप्टेंबर महिन्यात  महाराष्ट्रात लम्पी आजाराची साथ दिसू लागली. या आजारात आजवर देशातील लाखो गायी, गुरे मृत्यूमुखी पडली आहेत. दिवाळीच्या तोंडावरच या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.या आजारासाठी लसीकरण वगैरे उपाययोजना करण्यात आल्या परंतु तरीही त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.

 मुलांमध्ये गोवरची भीती

नोव्हेंबरपासून गोवरची साथ मुलांमध्ये दिसत आहे. सुरूवातीला मुंबई आणि त्यानंतर राज्याच्या विविध भागांत ही साथ पसरलेली दिसली. गोवरसाठीचे लसीकरण न झाल्याने त्याचा संसर्ग वाढत असल्याचे सांगितले जाते.  डिसेंबर 12 पर्यंत 10,416 केसेस गोवरची आढळून आली तर 40 जणांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.

लम्पीचा वाढता धोका

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने