गेल्या वर्षीच्या टीकेनंतर मोठा निर्णय; यंदा ऑस्करचे थेट प्रक्षेपण

मुंबई: गेल्यावर्षी ऑस्कर 2022 च्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी काही पुरस्कारांचे थेट-प्रक्षेपण न केल्याने अनेकांनी ऑस्करवर टीका केली होती. या टीकेला गांभीर्याने घेत ऑस्कर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार, यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील  23 श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय ऑस्करच्या आयोजकांनी घेतला आहे. पुरस्कार सोहळ्याचा वेळ वाचावा, यासाठी गेल्या वर्षी काही श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण करणे टाळले होते. त्यानंतर ऑस्करवर अनेकांनी टीका केली. त्यामुळे यंदाच्या सोहल्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नुकतीच ऑस्करचे आयोजक अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचे सीईओ बिल क्रॅमर यांनी पुरस्कारांच्या थेट प्रक्षेपणाबाबत मोठी घोषणा केली. बिल क्रॅमर यांनी सांगितले की, 2022 च्या पुरस्काराच्या थेट प्रक्षेपणामध्ये आठ श्रेणीतील पुरस्कार लाईव्ह दाखवण्यात आले नव्हते. आता सर्व 23 श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  



2022 मध्ये लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मूळ स्कोअर, मेकअप, केशरचना, लघुपट, चित्रपट संपादन, उत्पादन डिझाइन, अनिमेटेड शॉर्ट, लाइव्ह अक्शन शॉर्ट आणि साउंड या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण झाले नव्हते. पण यंदा तसे होणार नाही. यावर्षी सर्व पुरस्कार लाईव्ह पाहता येईल. जगभरातील सिनेरसिकांना आणि अभ्यासकांना उत्कंठा लागून राहिलेला ऑस्कर 2023 हा पुरस्कार सोहळा यंदा 12 मार्च 2023 रोजी होणार होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने