AIIMS नंतर आता जलशक्ती मंत्रालयावर 'सायबर हल्ला'; हॅकर्सनी Twitter केलं हॅक

दिल्ली: दिल्ली एम्सचं (Delhi AIIMS) सर्व्हर गेल्या आठवडाभरापासून ठप्प आहे. ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता आणखी एक मोठा सायबर हल्ला झाला असून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचं ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं आहे.आयटी तज्ज्ञांनी ते पुनर्संचयित केलं असलं, तरी सायबर हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळं सायबर सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून केंद्रीय यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी हॅकर्सनी मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटला लक्ष्य केलं. यानंतर हॅकर्सनी ग्राफिक्स पोस्ट केले, त्यावर Join Testnets आणि sui wallet असं नमूद केलं होतं. या ट्विटद्वारे त्यांनी अनेकांना टॅग केलं होतं. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. घाईघाईत सोशल मीडिया टीमनं अकाऊंट रिस्टोअर केलं आणि सर्व ट्विट डिलीट केले. त्याचबरोबर मंत्रालयाची वेबसाइट आणि इतर गोष्टीही तपासण्यात आल्या. हॅकर्सनी फक्त ट्विटर हँडलला टार्गेट केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने