“आता वेळ आलीए पूर्णविराम देण्याची…” सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते निराश

मुंबई: सुव्रत जोशी हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखलं जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचा हजरजबाबीपणा हा सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण आता मात्र त्याच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.सुव्रत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो, त्यांच्याच्या संपर्कात राहत असतो. पण आता एक फोटो पोस्ट करत त्याने “आता पूर्णविराम देण्याची वेळ झाली,” असं लिहिलं आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की तो नक्की कशाच्या संदर्भात बोलतोय. पण त्याची ही पोस्ट आहे त्याचं नाटक ‘अमर फोटो स्टुडिओ’ विषयी.पुढे तो म्हणाला, “अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे ह्या पाच दमदार कलाकारांनी उत्कृष्ट पद्धतीने ते नाटक सादर करून सर्व वयोगटातील नाटक वेड्या प्रेक्षकांची मनं जिकली, आणि महाराष्ट्रासहीत देश-विदेशात अत्यंत यशस्वी प्रयोग केले. सखी आणि सिद्धेश वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने थोडे विसावले, पण पर्ण पेठे आणि साईनाथ गणूवादने नाटकाच्या यशाची घोडदौड चालूच ठेवली. पण…आता वेळ आलीए पूर्ण विराम देण्याची. ज्या प्रेक्षकांनी उदंड प्रेम देऊन आम्हाला आनंद दिला, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी, जानेवारी २०२३ मधे ह्या नाटकाचे मोजके प्रयोग करीत आहोत.” त्याची ही पोस्ट वाचून त्याचे चाहते निराश झाले आहे. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत ते दुःख व्यक्त करत आहेत.

सुव्रतची महत्वपूर्ण भूमिका असलेलं ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक गेली अनेक वर्ष रंगभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु आता लवकरच हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुव्रतने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्याने या नाटकाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आणि लिहिलं, “२०१६ साली नव्या दमाच्या काही कलाकारांसोबत, प्रवासाला सुरुवात केली. ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे त्या प्रवासाचं नांव! मोठ मोठ्या कलाकारांच्या जोरात चाललेल्या नाटकांच्या पंगतीत आपल्या ह्या नवीन मेन्यूला कशी दाद मिळेल ह्याची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होती. मनस्विनी लता रविंद्र लिखित, निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित हे नाटक १३ ॲागस्ट २०१६ साली रंगमंचावर आलं!”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने