चित्रपटप्रेमींसाठी २० जानेवारीला 'सिनेमा लव्हर्स डे'! काय आहे भन्नाट ऑफर?

मुंबई:  चित्रपटप्रेमींना गेल्यावर्षीची एक ऑफर आठवत असेल त्यावेळी राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा गेला होता. त्यादिवसाच्या निमित्तानं कुठलाही चित्रपट त्याच दिवशी फक्त ७५ रुपयांत पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एक मोठी घोषणा मल्टिप्लेक्स थिएटरनं केली आहे.२० जानेवारीच्या निमित्तानं चित्रपटप्रेमींसाठी सिनेमा लव्हर्स डे साजरा केला जाणार आहे. यादिवशी तिकिटामध्ये मोठी सुट प्रेक्षकांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील प्रमुख मल्टिप्लेक्स असोशिएशनच्या वतीनं एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये यादिवशी प्रेक्षकांना अवघ्या ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. तिकिटावर जीएसटी लागू होणार नाही.चित्रपटप्रेमी आता २० जानेवारीला त्यांच्या आवडीचा कोणताही चित्रपट असोसिएशननं सांगितलेल्या किंमतीत पाहू शकणार आहे. या मल्टिप्लेक्स ऑर्गनायझेशनमध्ये पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या चित्रपटगृहांचा समावेश आहे. सिनेपोलिसनं तर सोशल मीडियावर देखील याविषयी पोस्ट शेयर केली आहे.सिनेमा लव्हर्स डे च्या निमित्तानं ही ऑफर लागू आहे. त्याच दिवशी त्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. याशिवाय काही निवडक शहरांमध्येच ही ऑफर लागू करण्यात येणार आहे. याविषयीची अधिक माहिती ही पीव्हीआरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेल्या वर्षी मल्टिप्लेक्सनं नॅशनल सिनेमा डे साजरा केला गेला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.मल्टिप्लेक्सनं असोशिएसने सांगितलेल्या माहितीनुसार, सिनेमा डेच्या निमित्तानं तब्बल ६५ लाख प्रेक्षकांनी त्या सुविधेचा लाभ घेतला होता. सिनेमा लव्हर्स डे ला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने