मशिदीमध्ये बॉम्बस्फोट! ६३ पोलिसांचा मृत्यू,150 हून अधिक जण जखमी

पेशावर: पाकिस्तानच्या पेशावर शहरातील पोलीस लाईनजवळ सोमवारी (30 जानेवारी) दुपारी एका मशिदीत स्फोट झाला. यात आत्तापर्यंत 63 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १५० हून अधिक लोक जखमी असून ४७ लोकांची प्रकृती गंभीर आहे.जखमींना पेशावरच्या लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. पेशावर येथील एका मशिदीत सोमवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला. हा ब्लास्ट पेशावर येथील पोलीस लायन्स परिस्थिती मशिदीत जोहर या नमाजादरम्यान झाला होता.तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये मारला गेलेला टीटीपी कमांडर उमर खालिद खुर्सानी याच्या मृत्यूचा बदला म्हणून हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला आला असल्याची माहिती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने