दोस्ती! अब्दू बिग बॉसच्या बाहेर..शिवला अश्रू अनावर

मुंबई : बिग बॉस16 सिझन हा चांगलाच रंगात आला आहे. या शोमध्ये आपण सगळंच पाहिलं मग ते वाद असो भांडण असो किंवा प्रेम आणि दोस्ती.. घरात शिव आणि त्याची मंडली ही तर सर्वांची आवडती आहे. ही मंडली सर्वांच मनोरंजन करत असते. त्याच्यातील एकजूट पाहिल्यानंतर घरातील इतर सदस्यही त्यांना चिडवतात. मात्र आता या मंडलीतील सर्वात क्यूट स्पर्धक अब्दू घरातुन बाहेर गेला.शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांची मैत्री तर सर्व प्रेक्षकांची आवडती जोडी होती. मात्र आता बिग बॉसच्या शो चा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. ज्यात अब्दु घरातून बाहेर जातांना दिसत आहे. त्याच्या जाण्याने घरातील सर्वच स्पर्धक दु:खी आहेत.बिग बॉसशी संबधित काही इतर सोशल मिडिया हँडलवर अब्दू घरातुन बाहेर जाणार असल्याचं सांगितलं जात होत.आता व्हायरल होत असलेल्या प्रोमोत बिग बॉस बोलताना दिसत आहेत की आतापर्यंत झालेल्या सिझनमध्ये असे पहिल्यांदाच झाले आहे. त्यानंतर अब्दु बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतो.सर्व स्पर्धकांना आधी हे खोटं वाटतं मात्र नंतर अब्दु बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतो. तेव्हा सर्वच स्पर्धकांना धक्का बसला आहे. अब्दुच्या जाण्याची घोषणा ऐकू आल्यावर शिवला रडू कोसळतं. निमृतही रडायला लागते. तो गेल्यानंतर घरातले स्पर्धक त्याच्या बद्दल बोलतांना दिसता आणि साजिद खान आणि टीना दत्तादेखील रडतांना दिसतात.अब्दु जितका शिवच्या जवळ होता तितकाच तो एम सी स्टॅन आणि साजिदचा लाडका होता. त्यामुळे त्याच्या दोघेही खुप दु:खी आहेत.बिग बॉसच्या घरात अब्दूची शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निम्रत कौर आहलूवालिया,सुंबुल तौकीर यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने