मोठी बातमी! एकाच दिवशी भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात

दिल्ली: राजस्थानमध्ये एका विमानाचा तर मध्यप्रदेशात २ हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उचैन पिंगोरा येथे लष्कराचे विमान कोसळले. विमान क्रॅश होऊन आग लागली. माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे.तसेच मध्य प्रदेशातील मुरैना येथे आज (शनिवार) सकाळी मोठा अपघात झाला. ज्यात हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० क्रॅश झाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करत आहेत. या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले, जेथे सराव सुरू होता.राजस्थानमध्ये देखील अपघात-

यूपीमधील आग्रा येथून उड्डाण करणारे विमान राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उछैन परिसरात कोसळले. चांगली गोष्ट म्हणाले हे विमान रहिवासी भागात कोसळली नाही. हे विमान भरतपूरमध्ये चार्टर्ड कोसळले. दरम्यान पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने