“तो मला स्वार्थी म्हणत असेल तर…” अक्षय केळकरच्या आरोपांवर अपूर्वा नेमळेकर थेट बोलली

मुंबई:  ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अक्षयने अपूर्वा नेमळेकरवर अनेक आरोप केले होते. यावर आता अपूर्वाने सडेतोड उत्तर दिले आहे.बिग बॉसच्या घरात असताना अक्षय केळकरने अपूर्वा नेमळेकरला स्वार्थी असे म्हटले होते. यावरुन ती फार जास्त दु:खी झाली होती. अनेक दिवस ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतरही अक्षय केळकरने अपूर्वा नेमळेकर ही स्वार्थी असल्याचे सांगितले होते. त्यावर आता अपूर्वाने सडेतोड उत्तर दिले आहे. ‘राजश्री मराठी’शी बोलताना अपूर्वाने याबद्दल तिचे मत व्यक्त केले.

दरम्यान तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश होता. यात राखी सावंत हिने बझर राऊंड या टास्कमध्ये बझर वाजवत बाहेर पडली. यामुळे बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, किरण माने आणि अमृता धोंगडे हे चार सदस्य राहिले. या टास्कनंतर पुन्हा एकदा एलिमेनेशन टास्क पार पडला. त्यात अक्षय केळकर आणि किरण माने बाहेर पडले. अखेर बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे दोन सदस्य टॉप २ सदस्य राहिले. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने