भागवतांचा ओवैसींकडून एकेरी उल्लेख करत टीका; म्हणाले, मुस्लिमांना इथं राहण्याची...

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतच मुस्लिमांबाबत केलेल्या एका विधानावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सडकून टीका केली. थेट एकेरी भाषेत उल्लेख करत मोहन कोण आहे जो मुस्लिमांना भारतात राहण्याची परवानगी देतोय? अशा शब्दांत त्यांनी भागवतांवर टीका केली. एकामागून एक ट्विट करत ओवैसी म्हणाले, मोहन कोण आहे जो मुस्लिमांना इथं राहण्याची किंवा आमची श्रद्धा जपण्याची परवानगी देतो. आम्ही भारतीय आहोत कारण अल्लाहची तशी इच्छा आहे. आमच्या नागरिकत्वासाठी अटी लादू शकतो. आम्ही इथं आमच्या धार्मिक भावना अॅडजस्ट करायला बसलेलो नाहीत. मोहननं म्हटलंय की, भारताला भारताबाहेरुन कुठलाही धोका नाही. संघी अनेक दशकांपासून 'अंतर्गत शत्रू' आणि 'युद्धाच्या स्थिती'बद्दल ओरडत आहेत तर लोककल्याण मार्गावरील त्यांचे स्वतःचे स्वयंसेवक म्हणतात “ना कोई घुसा है…”.



आरएसएसची विचारधारा भारताच्या भविष्यासाठी धोका आहे. जेवढ्या लवकर भारतीय हे खरे 'अंतर्गत शत्रू' ओळखतील, तेवढं चांगलं होईल. धर्माच्या नावाखाली असा द्वेष आणि कट्टरतावाद कोणताही सभ्य समाज सहन करू शकत नाही. मोहन यांना हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून कोणी निवडलं? 2024 मध्ये ते निवडणूक लढवणार आहेत का? पंतप्रधान इतर देशांतील सर्व मुस्लिम नेत्यांना मिठी का मारतात? पण आपल्याच देशात एकाही मुस्लिमाला मिठी मारताना दिसत नाही? त्यांची भाषणबाजी आणि द्वेषपूर्ण भाषण हे भाषण नाही तर प्रबोधन आणि युद्ध सामग्री काय आहे? असे सवालही ओवैसी यांनी केले आहेत.

काय म्हणाले होते भागवत?

माध्यमांशी बोलताना भागवत म्हणाले, "भारतात मुस्लिमांना घाबरण्यासारखं काहीच नाही. पण, तुम्ही श्रेष्ठत्वाची मानसिकता सोडली पाहिजे. आपण देशावर एकदा राज्य केलं आणि पुन्हा राज्य करू या विचारसरणीतून बाहेर यायला हवं. आज भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणतीही अडचण नाही. भारत हा भारतच राहिला पाहिजे हे साधं सत्य आहे"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने