फेब्रुवारी महिन्यात बँकांना 10 दिवस सुट्ट्या; काय असेल पर्यायी सुविधा?

नवी दिल्लीः फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राहकांना बँकेशी संबंधित कामांमध्ये मोठ्या अडचणी येणार असल्याचं दिसून येतंय. कारण पुढच्या महिन्यात बँकांना एक-दोन नव्हे तर तब्बल दहा सुट्ट्या आहेत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर फेब्रुवारी महिन्याच्या दहा सुट्ट्या दर्शवलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन व्यवहारांवर भर द्यावा लागेल.नवीन वर्षाचा पहिला महिना आता संपत आला आहे. फेब्रुवारी महिना आहेच २८ दिवसांचा. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीशिवाय महाशिवरात्री आणि अनेक महत्त्वाच्या दिवशी सुट्ट्या आहेत. वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहेत.कोणत्या दिवशी आहेत सुट्ट्या?

5 फेब्रुवारी- रविवार, ११ फेब्रुवारी - दुसरा शनिवार, १२ फेब्रुवारी- रविवार, १५ फेब्रुवारी- हैदराबाद, -तेलंगना राज्यात सुट्टी, १८ फेब्रुवारी- महाशिवरात्री, १९ फेब्रुवारी- रविवार, २० फेब्रुवारी- स्टेट डे, २१ फेब्रुवारी- लोसार, २५ फेब्रुवारी - चौथा शनिवार, २६ फेब्रुवारी रविवारी अशा सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येईल.

...तरी पाच रविवारने पळविल्या सुट्ट्या

शासकीय सुट्ट्या प्रमाणेच रविवार तसेच शनिवारच्या सुट्ट्या ही हव्याहव्याशा असतात. मात्र या वर्षामध्ये तब्बल ५ सुट्ट्या शनिवारी, रविवारी येत असल्याने या सुट्ट्याची मजा कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही. महाशिवरात्री (१८ फेब्रुवारी), रमझान ईद (२२ एप्रिल) आणि मोहरम (२९ जुलै) हे सण शनिवारी तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी) आणि दिवाळी लक्ष्मीपूजन (१२ नोव्हेंबर) रविवारी असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या चार सुट्ट्या बुडाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने