अबब! राहूल गांधीचा एकूण पायी प्रवास इतक्या किमीचा; जाणून घ्या चालण्याचे फायदे

दिल्ली: भारतात गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' चर्चेचा विषय होती. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा अखेर सोमवारी 30 जानेवारीला श्रीनगर येथे समाप्त करण्यात आली.या दरम्यान 135 दिवसांची ही भारत जोडो यात्रा राहूल गांधींनी कशी पुर्ण केली आणि त्यांना हा प्रवास एवढा सोपा कसा गेला, याचीही चर्चा रंगली होती कारण हा प्रवास वाटला तितका सोपा नव्हता. आज आपण राहूल गांधीनी एकूण किती किमीचा पायी प्रवास केला याविषयी जाणून घेणार आहोत.

राहुल गांधी भारत जोडो यात्रेत एवढे किमी चालले

राहूल गांधींनी भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथुन केली होती तर 30 जानेवारीला कश्मीरला ही यात्रा संपली. कन्याकुमारी ते काश्मिर या त्यांच्या 135 दिवसांच्या प्रवासात त्यांनी तब्बल 4 हजार किलोमीटरचा प्रवास केला.भारत जोडो ही फक्त राजनितिक यात्रा नव्हती तर तरुणांना चालण्यासाठी तसेच आरोग्यासाठी प्रेरीत करणं हा त्यामागचा राहुल गांधीचा उद्देश होता. राहूल गांधीच्या यात्रेत लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांनी सहभाग घेतला होता.या रॅलीदरम्यानचे अनेक फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. काही इमोशनल व्हिडीओही चर्चेचा विषय ठरले होते. आता त्यांच्या एवढ्या दिवसाच्या प्रवासात ते किती किमी चालले, यावरुन बरीच चर्चा रंगली आहे.चालण्याचे फायदे माहिती आहे का?

  • राहूल गांधी 135 दिवसांमध्ये चक्क 4000 किमी पायी चालले. खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे. पण तुम्हाला चालण्याचे फायदे माहिती आहे का? चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • चालणे हा सर्वात साधा आणि सोपा व्यायाम प्रकार आहे ज्यामुळे वजन नियंत्रित राहतं .

  • किती चालावे हे आपले वय, वजन,आणि शारीरिक क्षमता या गोष्टीवर अवलंबून असतं.

  • पहाटेची वेळ चालण्यासाठी ही सर्वोत्तम असते. वातावरण ताजे असते , हवेत गारवा आणि ऑक्सिजन जास्त असतो त्यामुळे थकवा कमी लागतो.

  • चालणे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण चालण्याने हाडे मजबूत होतात. कारण चालण्याने शरीरातील सर्व हाडांचा व्यायाम होतो आणि हाडे मजबूत होतात.

  • चालण्याने मूड फ्रेश राहतो. नैराश्य आणि तणावाच्या समस्येपासून दररोज चालण्याने आराम मिळू शकतो.

  • चालणाऱ्या लोकांच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण धावणाऱ्यांपेक्षा ६ पट जास्त असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

  • चालण्याने हृदय निरोगी राहते. चालण्यामुळे रक्ताभिसरणावर चांगला परिणाम होऊन हृदयविकार टाळण्यास मदत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने