भारती-हर्षचा बिगबॉसच्या घरात दंगा! सलमानला बनवलं मुलाचा बेबी सीटर..

मुंबई : बिग बॉस 16 च्या शुक्रवारचा वार खुप मजेशीर झाला. कारण या एपिसोडमध्ये सलमान खान भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया आले होते. यावेळी भारतीसोबत तिचा मुलगा गोलासोबत दिसली. सलमान खानने गोलासोबत मिळून खुप मज्जा केलीभारती सिंह देखील पती हर्षसोबत बिग बॉसच्या घरात आली. जिथे त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यासोबत मजामस्ती केली. बिग बॉस 16 मध्ये हर्ष आणि भारती वीकेंड का वार ला लोहड़ी साजरी करण्यासाठी आले होते. हर्षने सांगितलं की, त्याच्या मुलाची पहिली लोहड़ी आहे आणि या निमित्ताने ते या शोमध्ये आले आहे. दोघांनी मिळून शोच्या लोकांसोबत खूप मस्करी केली. भारती आणि हर्षनेही सगळ्या घरातील मैत्रिणींसोबत खेळ केला.हा गेमही खुप मजेदार होता. जिथं गुलाबी आणि पिवळे असे दोन संघ राहिले. यादरम्यान साजिद-सुंबूल-शिव, टीना-प्रियांका-शालीन बास्केटमध्ये स्विंगवर चेंडू टाकताना दिसले. या गेममध्ये शिवाची टीम पिंक जिंकली. त्याचबरोबर स्पर्धकांना काही खाण्याचे पदार्थही ओळखण्यास सांगितले.खुप मजामस्ती केल्यानंतर भारती-हर्ष यांनी सदस्यांना काही प्रश्न विचारले. शिवला विचारण्यात आले की, घरातील तीन स्पर्धक कोण आहेत ज्यांच घरात अस्तित्वात नाहीत. शिवने या गेममध्ये सौंदर्या, शालीन आणि टीना यांची निवड केली. यावरून तिघांमध्ये वादही झाली. त्याचवेळी प्रियांकाला विचारलं की या घरात कोणती तीन गाढवं आहेत. या उत्तरात प्रियांकाने सौंदर्या, टीना आणि शालीनच नावं घेतलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने