स्वतःच्या Microsoft कंपनीचा फोन वापरत नाही बिल गेट्स, कारण आहे खास

अमेरिका : बील गेट्स हे नाव कोणाला माहीत नाही?? आज ज्या स्क्रीनवर म्हणजेच ज्या मोबाइल वर किंवा ज्या कॉम्प्युटर वर तुम्ही आज हा लेख वाचताय ते म्हणजे केवळ एका माणसाच्या मेहनतीमुळे आणि तो म्हणजे दूसरा तिसरा कुणी नसून बील गेट्स! जगातल्या सर्वात श्रीमंत बिझनेस टायकून पैकी एक बील गेट्स आपल्याला परिचित आहेत ते त्यांच्या सर्वात मोठ्या कंपनीमुळे जीच नाव आहे मायक्रोसॉफ्ट! आज बील गेट्स हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात.आज मायक्रोसॉफ्ट चे नाव दुनियेच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे ते केवळ या कॉम्प्युटर युगाचा जनक मानल्या जाणाऱ्या बील गेट्स यांच्यामुळेच.पण जर तुम्हाला सांगितलं की, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ बिल गेट्स स्वत: च्या कंपनीचा नाही तर दुसऱ्या कंपनीचा फोन वापरतात... साहजिकच कोणत्याच व्यक्तीचा यावर विश्वास बसणार नाही.पण मंडळी हे खरंय... आणि खुद्द बिल गेट्स यांनीच या गोष्टीचा खुलासा केलाय. साधारणपणे स्मार्टफोन कंपनीचे मालक त्यांच्याच कंपनीचे फोन वापरतात. आणि बिल गेट्स मात्र याला अपवाद आहेत. त्यांनी स्वतः Reddit वर Ask-Me-Anything (AMA) सत्रादरम्यान याचा खुलासा केलाय.

सत्रादरम्यान बिल गेट्स यांनी सांगितले की त्यांच्याकडे मायक्रोसॉफ्टचा सरफेस ड्युओ फोन नाही. रोजच्या कामासाठी ते Samsung Galaxy Z Fold 4 फोन वापरतात. मात्र ते डेस्कटॉप, लॅपटॉपसाठी विंडोज वापरतात.बिल गेट्स यांनी Reddit वर Ask-Me-Anything (AMA) सत्रादरम्यान सांगितल की सॅमसंगच्या नवीन फोल्ड 4 च्या स्क्रीनच्या आकाराने गेट्स खूप प्रभावित झाले.ते म्हणाले की, फोल्ड 4 हा सॅमसंगचा सर्वोत्तम फोल्डेबल फोन आहे. आम्ही त्याला नो कॉम्प्रोमाइस फोल्डिंग फोन म्हणतो. सॅमसंगने हार्डवेअरमध्ये बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. फोनला अधिक मजबूत आणि टिकाऊ बनवलय, तसेच त्याची उपयोगिता वाढविण्यासाठी सॉफ्टवेअरद्वारे अनेक मल्टीटास्किंग ऑप्शन जोडले आहेत.बील गेट्स सांगतात की, जर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी उभी राहिली नसती किंवा म्हणावी तितकी लोकप्रिय झाली नसती तर ते खचून गेले नसते. त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी तिथे रिसर्चर म्हणून काम केले असते!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने