बॉबी अन् नीलम च्या लव्हस्टोरीत बाप धर्मेंद्र ठरला विलन.. असा झाला गेम..

मुंबई: बापाने बॉलीवुड गाजवलं असलं तरी पोराने मात्र जेमतेम कामगिरी केली अशी अनेक उदाहरणं बॉलीवुडमध्ये पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे धर्मेंद्र आणि बॉबी देओल.बॉबी सध्या त्याच्या बनेद सिरीजमुळे चर्चेत असला तरी त्याची एकूण कारकीर्द तशी फारशी उल्लेखनीय नाही. त्याचे बरेच चित्रपट फ्लॉप गेले तर अनेकदा नशिबाने त्याची साथ न दिल्याने काही चांगल्या संहिता त्याच्या वाट्याला आल्या नाहीत.अशीच त्याच्या प्रेमाची संहिताही अधुरीच राहिली, आणि त्याला कारण ठरले होते त्याचे वडील धर्मेंद्र.. आज बॉबीच्या वाढदिवासा दिवशी जाणून घेऊया बॉबीची अधुरी एक कहाणी..बॉलिवूड मध्ये अनेकांचं जुळतं आणि तुटतंही.. ते काही नवीन नाही.. पण बॉबी आणि अभिनेत्री निलम कोठारी यांचं नातं काही वेगळच होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. 90 च्या दशकात त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली. जवळपास 5 वर्षे ते एकत्र होते पण या कहाणीत बॉबीचे डॅडी धर्मेन्द्र  विलन झाले आणि सगळा डाव उद्ध्वस्त झाला.

सुरुवातीला बॉबी आणि नीलम त्यांच्या ब्रेकअपसाठी पूजा भट्टला दोषी ठरवलं गेलं. बॉबी व पूजा भट्टची जवळीक वाढल्याने नीलमने बॉबीशी ब्रेकअप केलं, अशा चर्चा उठल्या. पण सत्य काही वेगळेच होते.पुढे अनेक वर्षांनी एका मुलाखतीत खुद्द नीलमने या चर्चा खोट्या ठरवल्या.  ‘स्टारडस्ट’ या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत नीलम म्हणाली होती,' बॉबी व माझं ब्रेकअप कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिमुळे झालं नव्हतं. तो आम्ही दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता.' यावेळी तिने धर्मेंद्र यांचे नाव घेणे टाळले पण ते सत्यही नंतर बाहेर आलंच.असं म्हणतात की, सिनेमात काम करणारी मुलगी त्यांना सून म्हणून नको होती. म्हणून त्यांनी हे लग्न होऊ दिलं नाही.   बॉबीने अरेंज मॅरेज करावं, अशी त्यांची इच्छा होती. पित्याच्या इच्छेखातर  बॉबी नीलमपासून वेगळा झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने