सिगारेट बाबा! सिगारेट अर्पण करताच मिळतं खरं प्रेम, वाचा अजब कहाणी

लखनऊ: कधीही आयुष्यात कोणतीही अडचण आली तर अनेकजण देवाचं दार ठोठावतात आणि प्रार्थना करतात. जर तुम्हाला आयुष्यात खरं प्रेम मिळवायचं असेल तर तुम्ही उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे जाऊ शकतात. येथे जाऊन तुम्ही जर सिगारेट अर्पण केली तर तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकते.तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. लखनऊच्या एका बाबाच्या समाधीवर तुम्ही जर सिगारेट अर्पण केली तर तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकतं. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.प्रत्येकजण आपल्या परंपरा, धर्मानुसार इच्छा पुर्ण करण्यासाठी पुजा करतात. अनेकदा तुम्ही समाधीवर चादर अर्पण केल्याचे पाहिले असावेत पण उत्तर प्रदेशात एका समाधीवर लोक चादर नाही तर सिगारेट अर्पण करताहेत. ही समाधी वेल्स बाबाची असून या बाबांना सिगारेट बाबा म्हणून सुद्धा ओळखतात.या बाबाच्या दरबारी दूरवरुन लोक सिगारेट अर्पण करण्यासाठी येतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात.

सिगारेट बाबा कोण आहेत?

सिगारेट बाबांना वेल्स बाबा असेही म्हणतात. कॅप्टन फ्रेडरिक वेल्स हे ख्रिश्चन धर्मीय होते जे आधी ब्रिटीश सैन्यात नोकरी करायचे. वेल्स बाबांना सिगारेट आणि दारूची प्रचंड आवड होती. वेल्स बाबा जोडप्यांच्या जीवनात आनंद-प्रेम आणतात, असा समज आहे. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी लोक त्यांच्या समाधीवर सिगारेट अर्पण करतात. अनेकांना बाबा प्रसन्न झाल्याचेही दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने