विजय देवरकोंडा पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या अवतारात

मुंबई: साउथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याने त्याच्या पुढील तेलगू चित्रपट VD12 साठी गौतम तिन्ननुरीसोबत हातमिळवणी केली आहे. अभिनेत्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये त्याचा फर्स्ट लूक देखील पाहायला मिळत आहे.हे पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. यावेळी विजय देवरकोंडा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे. याआधी त्याने केवळ रोमँटिक आणि अॅक्शन भूमिका केल्या आहेत. मोठ्या पडद्यावर त्याला पोलिसांच्या अवतारात पाहणे खूप मनोरंजक असेल.विजय देवराकोंडाने त्यांच्या ट्विटर हँडलवर VD12 चे पोस्टर शेअर केले आहे. विजय देवरकोंडा अंधारात उभा असून तो खाकी वर्दीत दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर कापड बांधले आहे, त्यामुळे त्याचा लूक समोर आलेला नाही. पोस्टरमध्ये पाण्याच्या मध्यभागी एक जळणारे जहाजही दिसत आहे.पोस्टर शेअर करताना विजयने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'द स्क्रिप्ट, द टीम, माय नेक्स्ट'. या कॅप्शनवरून हा चित्रपट खूपच इंटरेस्टिंग असणार आहे असे दिसते. या चित्रपटाचे लेखन गौतम तिन्ननुरी यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी देखील त्यांनी घेतली आहे. यापूर्वी गौतमने जर्सी या स्पोर्ट्स-ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.विजय देवरकोंडा शेवटचा चित्रपट लिगरमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने अनन्या पांडेसोबत काम केले होते. पुरी जगन्नाध दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. मात्र, या चित्रपटातील विजय देवरकोंडाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाचा सहनिर्माता करण जोहर होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने