IPL 2023 मध्ये पंत मैदानाबाहेरच! सौरव गांगुलीने दिला दुजोरा

मुंबई: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबरला भीषण अपघात झाला. दिल्लीहून तो रुरकी येथील त्यांच्या घरी जात होता. डेहराडूनमध्ये प्राथमिक उपचारानंतर बीसीसीआयने त्याला मुंबईला हलवले.ऋषभ पंतच्या उजव्या पायाच्या लिगामेंटवर 6 जानेवारीला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला मैदानात परतण्यासाठी 6 महिने लागू शकतात, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत त्याच्या आयपीएल 2023 मध्ये खेळण्याबाबत साशंकता होती. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता पंत आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट केले आहे.दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी सांगितले की ऋषभ पंत आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही. कोलकात्यात माध्यमांशी बोलताना गांगुली म्हणाले की, पंतला सावरायला वेळ लागणार आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्समध्ये फरक पडेल. त्याच्या गैरहजेरीत दिल्लीचा कर्णधार कोण असेल या प्रश्नावर ते म्हणाले, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे.बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर तीन महिन्यांनी सौरव गांगुली क्रिकेटमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांना त्यांच्या संघाचे क्रिकेट संचालक बनवले आहे. गांगुली 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक देखील होता. त्यानंतर ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने