फिजिक्सच्या परिक्षेला आला गालीब; पेपरमध्ये लिहिल्या शेरो शायरी,

मुंबई:  आपण शाळेत असताना परिक्षेत कधी कॉपी केल्याच आठवतंय का? आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसल्यास अनेकवेळा आपण समोरच्या किंवा बाजूच्या मित्राचं उत्तर पाहून लिहिलं असेल. पण काही वेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर इकडे तिकडे पाहून, कॉपी करूनही मिळत नसल्याचं तो प्रश्न सोडून दिलाय पण एका पठ्ठ्याने भौतिकशास्त्राच्या पेपरमधील प्रश्नाखाली चक्क गाण्याचे लिरीक्स लिहून काढले आहेत.
विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेल्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर शिक्षकाने हा व्हिडिओ शेअर केला असून भौतिकशास्त्राच्या प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने हा पराक्रम केला आहे. "भाई लोग, कसम सें, दिल दुखता है मेरी जान, मैने तुझे देखा हसते हुए गालों में, बेबस खयालों मे,नदियों में नालों में...." असं उत्तर या पठ्ठ्याने पेपरमध्ये लिहिलंय.विद्यार्थ्यांनी लिहिलेलं उत्तर पाहून पेपर चेक करणारे शिक्षकही गोंधळले असून त्यांना या विद्यार्थ्याचा संताप झाला आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. अली झाफर यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने