'गदर 2' से फर्स्ट लुक रिलीज समोर..सनी पाजी आता हँडपंप नाही तर उचलणार

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सनी देओल आणि अमिषा पटेल या जोडीचा गदर हा चित्रपट गाजल्यानंतर आता अनेक दिवसांपासून चाहते 'गदर 2'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे मात्र त्याची अंतिम तारीख अद्याप समोर आलेली नाही. 'गदर 2' हा याच नावाच्या 2001 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून शुटिंगच्या सेटवरुन काही फोटो व्हायरल झाले होते. आता त्यातच निर्मात्यांनी 'गदर 2' मधून सनी देओलची पहिली झलक दाखवली आहे. सनी देओल 'गदर'मध्ये हँडपंप उपटतांना दिसत होता, तर यावेळी 'गदर 2'मध्ये तो बैलगाडीचे चाक हवेत फिरवताना दिसत आहे.झी स्टुडिओने अलीकडेच एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या आगामी 2023 चित्रपटांच्या नावांची झलक दिली आहे. यापैकी एक नाव गदर 2 देखील होते. 'गदर 2' ची झलक छोटी असली तरी त्यात सनी देओलचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सनी देओलला तारा सिंगच्या अवतारात पाहून चाहते आनंदाने वेडे झाले.गदर 2' च्या एका छोट्या झलकमध्ये सनी देओल हातात बैलगाडीचे चाक घेऊन तारा सिंग शत्रूंशी लढताना दिसतोय. हा फर्स्ट लुक समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर #Gadar2 ट्रेंड करायला सुरुवात केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने