दातांची डॉक्टर आहे अदानींची बायको, पहिल्या भेटीत केलं होतं रिजेक्ट

मुंबई: सध्या अदानी घसरलेल्या शेअर्सवरुन आणि Hindenburgनी लावलेल्या आरोपावरुन चांगलेच चर्चेत आहे. जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले अदानी यांचे राहणीमान अत्यंस साधे आहे. सतत बिझिनेसमुळे चर्चेत येत असलेले अदानीची तुम्हाला लव्हस्टोरी माहिती आहे का? आज आपण गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदानीच्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेऊया. 

गौतम अदानींची लव्हस्टोरी

गौतम अदानी च्या लाइफस्टाइलनुसार त्यांची लव स्टोरीपण खूप सिंपल आहे. आर एन भास्करच्या 'Gautam Adani: Reimagining Business in India' या पुस्तकात गौतम अदानी आणि त्यांची पत्नी प्रीती अदानीच्या लव्हस्टोरीरीविषयी सांगितले.आर एन भास्कर च्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे प्रीती अदानी यांना गौतम अदानी पहिल्या भेटीत आवडले नव्हते. प्रीतीचे वडील सेवंतीलाल यांना गौतम अदानी आवडले होते आणि त्यावेळी अदानींनी ग्रॅजुएशनसुद्धा पुर्ण केले नव्हते तर प्रीती या डेंटीस्टचा कोर्स करत होत्या.


प्रीतीचे वडील सेवंतीलाल यांनी प्रीतीला समजावले की व्यक्तीचे कौशल्य पाहावे लागते. त्यानंतर त्यांनी प्रीतीला अदानीसोबत भेटण्यास तयार केले आणि दोघांची भेट झाली. पहिल्याच मुलाखतीत दोघांनी एकमेकांशी बातचीत केली आणि त्यानंतर प्रीती या लग्नाला तयार झाल्या. 1 मे 1986 ला प्रीती आणि गौतम यांचं लग्न झालंलग्नानंतर प्रीती अदानी आणि गौतम अदानीसाठी काही काळ खूप कठीण होता. गौतम अदानी यांना कामानिमित्त अनेकदा बाहेर जावं लागायचं पण जेव्हाही त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते त्यांची पत्नी आणि कुटूंंबासोबत वेळ घालवायचे. आरएन भास्करच्या पुस्तकात लिहल्याप्रमाणे प्रीती सांगतात की गौतमला त्यांचं काम संपवून घरी वेळ देता यायचा.प्रीती अदानी आणि गौतम अदानी यांच्या लग्नाला 36 वर्ष पुर्ण झाले आणि आजही त्यांचं वैवाहीक जीवन तेवढ्याचे प्रेमानी भरलेलं आहे. शांतीलाल आणि शांताबेन अदानी यांच्या पाच मुलांपैकी गौतम हा पाचवा मुलगा आहे. गौतम अदानी यांना दोन मुलं आहेत. जीत अदानी आणि करण अदानी. करणचं लग्न झालं आहे ज्यांना एक मुलगी देखील आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने