वो भी क्या दिन थे....१९८५ चे रेस्टॉरंटचे बिल व्हायरल; केवळ ८ रुपयात शाही पनीर तर...

मुंबई: केवळ ८ रुपयात शाही पनीर... म्हटल्यावर तुमच्या सर्वांच्या भुवया उंचावतील पण ही किंमत सध्याची नाही तर १९८५ची किंमत आहे. वाचून आश्चर्य वाटेल. पण हो. सध्या सोशल मीडियावर एका रेस्टॉरंटचे बिल व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये खाद्यपदर्थांच्या किंमती ऐकून वो भी क्या दिन थे.... असं आपसूकच तोंडातून निघेल. खाद्यपदार्थ बिलाचा व्हायरल होणार फोटो 12 ऑगस्ट 2013 रोजी फेसबुक पेज लाझीज रेस्टॉरंट आणि हॉटेलने शेअर केले होता, जे पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बिलाची तारीख 20 डिसेंबर 1985 आहे, ज्यामध्ये शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटीचे दर लिहिले आहेत.

1985 चे हे बिल एका रेस्टॉरंटने फेसबुकवर शेअर केले होते, त्यानुसार त्यावेळी शाही पनीर, दाल मखनी, रोटी आणि रायता ज्या किंमतीत मिळत होते, आज त्या किमतीत फक्त अर्धा लिटर दूध देखील येत नाही.खाद्य पदार्थांचे बिलाचा फोटो हे फेसबुक पेज Lazeez Restaurant & Hotel द्वारे शेअर केले गेले होते, जे पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बिलाची तारीख 20 डिसेंबर 1985 आहे, ज्यामध्ये शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटीचे दर लिहिले आहेत.त्यावेळी शाही पनीर अवघ्या आठ रुपयांना, दाल मखनी आणि रायता पाच रुपयांना मिळत होते. तर एका रोटीची किंमत 70 पैसे होती. एकूणच, हे संपूर्ण बिल २६ रुपये ३० पैसे आहे, ज्यामध्ये २ रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट आहे.काहीदिवसांपूर्वी एक बिल व्हायरल होत होते. अबुधाबीमधील एका रेस्टॉरंटमध्ये काही लोकांनी जेवण केले आणि 1.3 कोटी रुपयांचे बिल बनवले, ज्याचा फोटो रेस्टॉरंटचे मालक (नुसर-एट) शेफ नुसरत गोकसे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो 'सॉल्ट बे' म्हणून ओळखला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने