भारतीय हॉकी संघाला हवाय मोठा विजय

मुंबई: यजमान भारतीय हॉकी संघाला विश्‍वकरंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी उद्या वेल्सविरुद्ध होणाऱ्या ड गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत मोठ्या गोलफरकाने विजय मिळवणे आवश्‍यक असणार आहे.ड गटाच्या गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिल्यास त्यांना क्रॉस ओव्हर लढत खेळावी लागेल. या लढतीत विजय मिळवल्यानंतर भारताला उपांत्यपूर्व फेरीत खेळता येणार आहे.भारत व इंग्लंड या दोन्ही देशांनी ड गटामध्ये प्रत्येकी चार गुणांची कमाई केली आहे; मात्र सरस गोलफरकाच्या जोरावर इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

पेनल्टी कॉर्नरवर लक्ष

भारतीय हॉकी संघाला यंदाच्या स्पर्धेमध्ये पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले आहे. पहिल्या दोन लढतींत भारताला तब्बल ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण यामध्ये एकही गोल करता आला नाही.आजच्या लढती

मलेशिया-न्यूझीलंड, दुपारी १ वाजता

नेदरलँड्‌स-चिली, दुपारी ३ वाजता

स्पेन-इंग्लंड, सायंकाळी पाच वाजता

भारत-वेल्स, सायंकाळी ७ वाजता

गटात अव्वल येण्याचा प्रयत्न : मनप्रीत

भारतीय हॉकी संघाचा मधल्या फळीतील खेळाडू मनप्रीत सिंग या वेळी म्हणाला, आमचा संघ गटामध्ये अव्वल येण्याचा प्रयत्न करणार आहे. क्रॉस ओव्हर लढत टाळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने