हृतिक कसा साजरा करणार आपला ४९ वा वाढदिवस? समोर आला बर्थ डे प्लॅन..

मुंबई : बॉलीवूड स्टार हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे आणि हा जन्मदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी अभिनेत्याकडे खूप कारणं देखील आहेत.हृतिकने 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'विक्रम वेधा'या चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अशातच, हृतिक रोशन आता भारतातील पहिला एरिअल ॲक्शन एंटरटेनर सिनेमा 'फाइटर'सह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहे.हृतिक रोशन हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो नेहमीच क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर विश्वास ठेवतो. तसेच, कधीही चांगली स्क्रिप्ट न सोडता त्याने तेच चित्रपट केले जे त्याला खरोखर करायचे होते.वैयक्तिक जीवनातही हृतिक असाच विचार ठेवून आयुष्य जगताना दिसून येतो. कारण हृतिक रोशन आता त्याचा वाढदिवस अशा गोष्टींच्या सान्निध्यात साजरा करू इच्छितो ज्या गोष्टी त्याला मानसिक शांती देतात.



वाढदिवसानिमित्त त्याच्या उत्साहाबद्दल विचारले असता, हृतिक म्हणाला, “मी वाढदिवस एक मजेशीर दिवस म्हणून पाहायचो...पार्टी झालीच पाहिजे, लोकांना बोलावलंच पाहिजे..त्याचा आपल्या कामात फायदा होईल असा माझा विचार असायचा. पण आता मी माझा वाढदिवस मला समाधान कशातून मिळेल हा विचार मनात ठेवून साजरा करणार आहे. माझी स्वतःची इच्छा काय आहे..मी कशानं तृप्त होईल हा विचार माझ्यासाठी महत्त्वाचा असेल या दिवशी..., आणि हे मी सर्व मनापासून म्हणत आहे...हा मी स्वतःवर लादलेला विचार नाही''.हृतिक रोशन नेहमीच ऑन आणि ऑफस्क्रीन खराखुरा राहिला आहे. आणि याच कारणामुळे तो सोशल मीडियावरील सर्वात प्रिय आयकॉन्सपैकी एक आहे यात शंका नाही.

अशातच, जेव्हा हृतिकला विचारण्यात आले की या 49 वर्षांमध्ये त्याची सर्वात मोठी शिकवण काय आहे, तेव्हा पिरॅमिडचं उदाहरण देत हृतिक म्हणाला, "पिरॅमिडच्या टॉपवर ती शांतता मिळत नाही जी आपणं आपलं काम पूर्ण झाल्यावर मिळेल अशी आशा असते. खरंतर शांती हिच सगळया गोष्टींचा आधारस्तंभ आहे. आपल्याला मन शांत ठेवून सगळ्या गोष्टींची सुरुवात करायला हवी''.'विक्रम वेधा' मधील त्याच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून कौतूक झाल्या नंतर, हृतिक रोशन आता 2023 मध्ये 'फायटर'या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच, दीपिका पदुकोणसोबतचे तो पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने