विद्यार्थीनीच्या पहिल्याच प्रश्नाने PM मोदी क्लिनबोल्ड, पंतप्रधान म्हणाले गुगली...

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. 'परीक्षा पे चर्चा-2023' या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी मिळाली. विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 200 विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर होते.  संवादात्मक सत्रादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळस अश्विनीने पंतप्रधान मोदींना पहिला प्रश्न विचारले की, परीक्षेच्या निकालाच्या अपेक्षांशी संबंधित कुटुंबातील सदस्यांचा दबाव कसा हाताळायचा. यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, अश्विनी आपण क्रिकेट खेळता का?. क्रिकेटमध्ये गुगली बॉल कसा असतो निशाना एक आणि दिशा वेगळी. मला असे वाटते की, तुला मला पहिल्या बॉल क्लिनबोल्ड करायचा आहे.



पंतप्रधान मोदी म्हणाले. कुटुंबांमध्ये अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण, जर कुटुंबातील सदस्य केवळ त्यांच्या सामाजिक स्थितीवर आशा ठेवत असतील, तर ती चिंतेची बाब आहे. तुम्ही चांगलं काम करत असाल तर प्रत्येकाला तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. मी राजकारणात आहे आणि माझ्या बाबतीतही असंच घडतं, असंही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.यावर्षी सुमारे 38 लाख विद्यार्थ्यांनी PPC 2023 साठी नोंदणी केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, 20 लाख प्रश्न प्राप्त झाले आहेत आणि एनसीईआरटीने कौटुंबिक दबाव, फिट आणि निरोगी कसे असावे, करिअर निवड, तणाव व्यवस्थापन आणि बरेच काही यासारखे विषय निवडले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने