मुलीचा घटस्फोट घ्यायला आलेल्या बापाला 'जज'ने झापलं;

पटना : लग्न झाल्यानंतर पती पत्नीमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या कारणावरून भांडणे होत असतात. तर हा वाद नंतर घटस्फोटानंतर जाऊन पोहोचतो. सध्या बिहार येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आपल्या लेकीचा घटस्फोट घ्यायला आलेल्या बापाला न्यायाधीशाने झापलं आहे.न्यायाधीशाने मुलीला समजावून सांगत तिला सासरी पाठवली आहे. तर आपल्या लेकीचं नांदणं मोडायचा विचार करू नका म्हणत मुलीच्या बापाला झापलं आहे. न्यायाधीशांच्या समजावण्यानंतर मुलगी आपल्या पतीकडे सासरी जायला तयार झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.दरम्यान, सदर मुलीचा नवरा तिला मारहाण करतो म्हणून वडिलांनी तिला घेऊन घटस्फोट घेण्यासाठी न्यायालय गाठलं पण पटना उच्च न्यायालयातील न्यायाधीशाने त्या बापाला सुनावणीदरम्यान चांगलंच झापलं. तर मुलीलाही समजावून सांगितलं आहे."तू माहेरी येऊन काय करशील, आईवडील आता म्हातारे होतील, तू काय करशील? तुला नवऱ्यासोबत राहायचं नाही का? नवरा सरकारी नोकरीला आहे, काय अडचण आहे?" असे प्रश्न विचारत तिची समजूत काढली आणि त्यानंतर ती मुलगी सासरी जायला तयार झाली आहे. तर या सुनावणीनंतर लगेच ती सासरी गेली आहे.न्यायाधीशाच्या सुनावणीने आणि मुलीच्या समजूतीने एक संसार मार्गी लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या न्यायाधीशाचे कौतुक केले जात आहे. पटना उच्च न्यायालयातील न्यायाधीश संदीप कुमार असं त्यांचं नाव असून त्यांच्यावर नेटकऱ्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने