‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण होणार

कोल्हापूर:  जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) लेखापरीक्षण झाले. यामध्ये लेखापरीक्षकाने संघाचे वास्तविक आणि खरे लेखे उघडकीस आणलेले नाहीत. त्यामुळे, गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती.त्यानुसार दहा दिवसांत गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण करावे, अशा सूचना लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांना आज दिल्या आहेत.शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या काही व्यवहारांबाबत माहिती मागवली होती. सत्ताधाऱ्यांकडून ही माहिती दिली नाही. तसेच, संघाचे लेखापरीक्षण झाले.यामध्ये काही त्रुटी आहेत. लेखा परीक्षणात अनेक बाबींची उकल झालेली दिसत नाही, असा दावा करीत सौ. महाडिक यांनी गोकुळकडून आपल्याला कोणतीही योग्य माहिती दिली जात नाही. संचालक पदाच्या अधिकारावर गदा आणली जात आहे.संचालिका म्हणून महाडिक यांनी जे प्रश्‍न उपस्थित केले, त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी गोकुळ प्रशासनाला दिले होते. गोकुळकडून या प्रश्‍नांबाबत कोणताही खुलासा मिळाला नाही.

याशिवाय, गोकुळने केलेल्या लेखापरीक्षण अहवालात अनेक त्रुटी आहेत. दोष असतानाही हे मुद्दे बाजूला पडले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, या सर्वांचे चाचणी लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी केली आहे. सौ. महाडिक यांनी मागणीसोबत काही कागदपत्रेही जोडली आहेत. समावेश केला आहेत. त्या कागदपत्रांचाही लेखापरीक्षणात विचार केला जाऊ शकतो.‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर सौ. महाडिक यांच्याकडून सातत्याने संघाच्या कारभाराविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात होते.निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच वार्षिक सर्वसाधारण सभेत सौ. महाडिक यांनी प्रश्‍नांची सरबती केली; पण त्यांचा आवाज व्यासपीठापर्यंत पोहणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली होती.त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संघाचे नेते व संचालकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सौ. महाडिक यांच्यासह त्यांच्या गटाला बळ मिळाले आहे. त्यातून त्यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन संघाच्या लेखापरीक्षणाचे आदेश काढण्यात आले.

इशारा आणि नोटीस

दोन दिवसांपूर्वीच सौ. महाडिक यांनी फेसबुक पोस्टद्वारे ‘गोकुळ’च्या कारभाराचा भांडाफोड करण्याचा इशारा दिला होता. मी चार महिने गप्प होते.कारण योग्य ती माहिती मला मिळत नव्हती. लवकरच पत्रकार परिषदेत कारभार चव्हाट्यावर आणू, असा इशारा त्यांनी या पोस्टमध्ये दिला होता. त्यानंतर दोनच दिवसांत या चौकशीचे आदेश निघाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने