"फक्त श्रीमंतांनाच परवडेल..."; लक्झरी क्रूझवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

 नवी दिल्ली : गंगा विलास नावाच्या जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, " हे भारतातील पर्यटनाचे एक नवीन युग आहे. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी याला "घाणेरडे" म्हटले आहे.जयराम रमेश युपीएच्या काळात पर्यावरण मंत्री होते. मात्र, नंतर त्याने आपले ट्विट दुरुस्त केले, ज्यात क्रूझची प्रति रात्रीची फी चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसी येथून गंगा रिव्हर क्रूझला हिरवा झेंडा दाखवला. जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ म्हणून ओळखली जाणारी ५१ दिवसांची क्रूझ १ मार्च रोजी आसाममधील दिब्रुगड येथे आपल्या अंतिम गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.गंगा नदीवर जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ सेवेची सुरुवात हा एक ऐतिहासिक क्षण आहे, यामुळे भारतात पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे क्रूझला प्रत्यक्ष हिरवा झेंडा दाखवत सांगितले होते.एमव्ही गंगा विलास हे क्रूझ जहाज वाराणसीहून रवाना झाल्यानंतर ५१ दिवसांत ३,२०० किलोमीटरचे अंतर पार करेल.

२७ नद्या आणि अनेक राज्ये ओलांडून दिब्रुगडमध्ये आपला प्रवास संपवणार आहे. यामाध्यमातून तुम्हाला बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशमधील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी सारख्या राष्ट्रीय उद्याने, नदी घाट आणि प्रमुख शहरांना भेट देता येणार आहे.या क्रूझमध्ये सर्व लक्झरी फीचर्स असलेले तीन डेक, ३६ पर्यटकांची क्षमता असलेले १८ सूट आहेत. या क्रूझच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील ३२ पर्यटक रवाना झाले आहेत.

जयराम रमेश आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, श्रीमंतांखेरीज एका रात्रीसाठी ५० लाख रुपये कोण खर्च करू शकेल? गंगा अजूनही शुद्ध नाही आणि निर्मळही झाली नाही.आता या नवीन तमाशामुळे भारतातील जलसृष्टी आणि गंगा डॉल्फिन धोक्यात येतील, असंही रमेश यांनी ट्विट करून म्हटलं. मात्र जयराम रमेश यांनी आपली चुक सुधारत लगेचच सुधारित ट्विट केलं. त्यांनी तिकीटाची रक्कम चुकवली होती. सुधारीत ट्विटमध्ये त्यांनी तिकीटाची रक्कम ५० हजार लिहिली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने