लक्षात ठेवा! 23 जानेवारी 2023.. येतोय 'बाळसाहेबांचा राज'.. काय आहे प्रकरण?

मुंबई:  23 जानेवारी ही तारीख महाराष्ट्रासाठी नवीन नाही. महाराष्ट्रातील एका झंझावाताचा म्हणजे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा तो जन्मदिवस. त्यांच्या पश्चात हा दिवस आपण त्यांची जयंती म्हणून साजरा करतो. पण याच दिवशी एक मोठी कलाकृती रंगभूमीवर येणार आहे, ती म्हणजे बाळासाहेबांचा राज..

बाळसाहेब ठाकरे हा सध्या ज्वलंत हा विषय झाला आहे. बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे हा वाद अजूनही मिटलेला नाही. मूळ शिवसेना असताना त्यातून शिंदे गत तयार झाला आणि पुढे 'बाळसाहेबांची शिवसेना' या पक्षाची निर्मिती झाली. त्यात राज ठाकरे ही शिवसेनेतून बाहेर पडलेले परंतु स्वतंत्र पक्ष काढलेले. असे असले तरी राज आणि बाळासाहेब यांचे बंध आणि जवळीक सर्वांनाचठावूक आहे. त्यांचे हेच नाते आता 'बाळसाहेबांचा राज' या नाटकातून रंगभूमीवर येत आहे.बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे प्रमुख राज ठाकरे  यांच्या आयुष्यावर नाटक येत आहे. 'बाळासाहेबांचा राज' असे या नाटकाचे नाव आहे. या दोन अंकी नाटकाचा शुभारंभ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सोमवार दिनांक 23 जानेवारीला होणार आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात दुपारी ४.३० वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.नुकतेच नाटकाच्या पोस्टरचे उदघाटन मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे ठाणे/पालघर जिल्हाध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी नाटकातील कलाकार सचिन नवरे, प्रफुल आचरेकर, नितीन बोढारे हजर होते. याशिवाय लेखक/दिग्दर्शक अनिकेत बंदरकर असे मान्यवर उपस्थित होते. प्रमोद गांधी यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने