Google चे धाबे दणाणार, टक्कर देण्यासाठी Microsoft-ChatGPT ने तयार केला खास प्लॅन

दिल्ली: Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. मात्र, ChatGPT आल्यापासून गुगलच्या मक्तेदारीला टक्कर मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ओपनएआयचे चॅटबोट ChatGPT च्या माध्यमातून अनेक कामे सहज करणे शक्य होते. त्यामुळे याला चॅटजीपीटी गुगलचा प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे Microsoft चॅटजीपीटीच्या माध्यमातून गुगलला टक्कर देणार आहे. रिपोर्टनुसार, Microsoft आर्टिफिशियल इंटेलिजेंस ChatGPT चा आपल्या प्लॅटफॉर्मवर वापर करू शकते.
Bing व्हर्जन लाँच करणार

रिपोर्टनुसार OpenAI च्या ChatGPT चा वापर करून Microsoft सर्च इंजिन Bing चे नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, मायक्रोसॉफ्ट या नवीन फीचरला मार्चअखेर लाँच करू शकते.मायक्रोसॉफ्टने Bing वर ChatGPT चा वापर केल्यास यामुळे थेट गुगलला टक्कर मिळू शकते. गेल्यावर्षी मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली होती की, कंपनीची योजना इमेज-जनरेशन सॉफ्टवेअरला Bing मध्ये अ‍ॅड करणे आहे.

इमेज क्रिएशन सॉफ्टवेअरसाठी Dall-E 2 ची मदत घेतली जाईल. आता कंपनी ChatGPT ला सर्च इंजिनमध्ये जोडण्याचा विचार करत आहे. परंतु, OpenAI आणि Microsoft कडून याबाबत कोणतीही देण्यात आलेली नाहीमायक्रोसॉफ्ट वर्ष २०१९ पासून आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी OpenAI ला सपोर्ट करत आहे. कंपनीने १ बिलियन डॉलर फंडिंग देखील दिले आहे. OpenAI ने ChatGPT चॅटबोटला तयार केले आहे. यूजर्ससाठी याचे टेस्टिंग देखील सुरू केले आहे.दरम्यान, ChatGPT चर्चेत आल्यापासून अनेकांनी यामुळे लोकांना नोकरी गमवावी लागू शकते, अशी शक्यता देखील वर्तवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने